अखेर राजूर पाणी योजना सुरळीत
By Admin | Updated: June 30, 2016 01:20 IST2016-06-30T01:12:59+5:302016-06-30T01:20:22+5:30
राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली,

अखेर राजूर पाणी योजना सुरळीत
राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली, अशी माहिती प्रभारी सरपंच संतोष बनसोडे यांनी दिली.
निळवंडे धरणातून संगमनेर - अकोले तालुक्यासाठी पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी खाली गेली आणि येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोरडी पडली.
ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर योजना पूर्ववत करण्यासाठी निधीचा प्रस्ताव महाराष्ट्रातील जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला. मात्र यावर कार्यवाही होत नसल्याचे पाहून येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व सर्व कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा पूर्ववत करण्याच्या कामाला लागले. त्यांच्या प्रयत्नांना बुधवारी यश आले आणि सायंकाळी चार वाजता ही योजना सुरळीत सुरू झाली. शासकीय पातळीवरून मदत होत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संतोष बनसोडे, ग्रामविकास अधिकारी नेजाती भाबड, माजी सरपंच तथा सदस्य गणपत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी जयराम नवाळी, मंगेश पोटे, देवराम जाधव व बाळू नवाळी आदी कर्मचाऱ्यांनी जुन्या विहिरीत वीजपंप सोडला व सर्व यंत्रणेची जुळवाजुळव करत रोज तीन दिवस परिश्रम घेत योजना कार्यान्वित केली.
योजना सुरू झाल्यामुळे पाण्यासाठी सुरू झालेली राजूरकरांची वणवण आता थांबणार आहे. (वार्ताहर)