जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 12:36 IST2021-03-06T12:23:08+5:302021-03-06T12:36:29+5:30
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांचे नाव निश्चित झाले आहे. हे दोघेही अर्ज दाखल करण्यासाटी जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले आहेत.

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके, तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी उदय शेळके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी माधवराव कानवडे यांचे नाव निश्चित झाले आहे. हे दोघेही अर्ज दाखल करण्यासाटी जिल्हा बँकेच्या सभागृहाकडे रवाना झाले आहेत.
जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची शनिवारी दुपारी १ वाजता बँकेच्या मारुतराव घुले पाटील सभागृहात होत आहे. त्यामध्ये ही निवड होण्याची शक्यता आहे.
त्यापूर्वी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारीच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारणतंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्रजाक्त तनपुरे यांचा ताफा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या बंगल्यावर आला. नव्या संचालकांची तिथेच बैठक झाली व अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरच दोघे अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले आहेत.