दोन युवकांनी विष घेतले, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: October 27, 2023 16:41 IST2014-09-10T23:33:18+5:302023-10-27T16:41:28+5:30

अहमदनगर: भिस्तबाग महालावर मंगळवारी सायंकाळी दोन युवकांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Two youths take poison, death of one | दोन युवकांनी विष घेतले, एकाचा मृत्यू

दोन युवकांनी विष घेतले, एकाचा मृत्यू

अहमदनगर: भिस्तबाग महालावर मंगळवारी सायंकाळी दोन युवकांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी शुभम् संजय रायकर (वय १६, रा. भिस्तबाग परिसर) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
भिस्तबाग महालाच्या परिसरातील दोन मित्र शुभम संजय रायकर (वय १६) आणि कुमार नामदेव लांडे (वय १६, दोघेही रा. भिस्तबाग परिसर) हे भिस्तबाग महालाच्या परिसरात गेले. तेथे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघे बेशुद्ध झाले. यावेळी बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आलेला कुमार लांडे हा कसाबसा त्याच्या घरी पोहोचला. यावेळी त्याने सारी हकिकत घरच्यांना सांगितली. यावेळी त्याचा मित्र शुभम यानेही विष प्राशन केल्याचे त्याने सांगितले. यावरून शुभम याच्या घरी ही माहिती कळविण्यात आली. त्यांनी तातडीने शुभमला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कुमार लांडे याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. या प्रकरणात याआधीही एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली,याचा पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जावून तपास केला. (प्रतिनिधी)

Web Title: Two youths take poison, death of one