राहुरीमध्ये वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:38 IST2018-09-13T16:38:05+5:302018-09-13T16:38:25+5:30
तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (दि. १२ सप्टेंबर) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातातील वाहन पसार झाले आहे.

राहुरीमध्ये वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार
राहुरी : तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे बुधवारी (दि. १२ सप्टेंबर) मध्यरात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील दोन तरुणांचा जागेवर मृत्यू झाला. अपघातातील वाहन पसार झाले आहे.
पांडुरंग भागवत तुपे (वय - २७ वर्षे) व योगेश आबासाहेब गवांदे (वय २९, दोघे ाहणार राहुरी फँक्टरी) हे दोन तरुण दुचाकीवरुन जात होते. त्यांना राहुरी फॅक्टरी परिसरातील मध्यरात्री अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुणांच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा होऊन दोघेही जागेवरच ठार झाले. घटनेची माहिती कळताच राहुरीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवालदार रामनाथ भाबड, महेंद्र गूंजाळ, गुलाब मोरे, रोहकले व लक्ष्मण बोडखे धाव घेतली. याबाबत राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा तपास हवालदार रामनाथ भाबड हे करीत आहे..