अपघातात दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:58 IST2021-02-20T04:58:37+5:302021-02-20T04:58:37+5:30

कर्जत : कर्जत - मिरजगाव मार्गावरील पठारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण ठार झाले. अशोक शहाजी ...

Two young men killed in the accident | अपघातात दोन तरुण ठार

अपघातात दोन तरुण ठार

कर्जत : कर्जत - मिरजगाव मार्गावरील पठारवाडी फाट्यावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण ठार झाले. अशोक शहाजी निंबाळकर (वय ३५, रा. बहिरोबावाडी) व सुरज वैभव कुलथे (वय २२, रा. राशीन) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

अशोक निंबाळकर हे गुरुवारी सायंकाळी घराजवळील रस्ता पार करून त्यांच्या शेतात पायी चालले होते तर सुरज कुलथे हा दुचाकीवरुन मिरजगाव येथून कर्जतकडे येत होता. यावेळी सुरज कुलथे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याने पायी जाणाऱ्या अशोक निंबाळकर यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये अशोक यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच सुरज कुलथे हाही गंभीर जखमी झाला. दोन्ही जखमींना नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, अशोक निंबाळकर यांचे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच निधन झाले होते तर सुरज कुलथे याला उपचारसाठी नगर येथे नेत असताना वाटेतच निधन झाले. अशोक निंबाळकर यांच्यावर शुक्रवारी बहिरोबावाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर सुरज कुलथे यांच्यावर राशीन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Two young men killed in the accident