लोणीत दोन दिवसात दोन कामगारांच्या गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:27 IST2020-06-25T16:26:13+5:302020-06-25T16:27:54+5:30
लोणी : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोन जणांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

लोणीत दोन दिवसात दोन कामगारांच्या गळफास घेऊन आत्महत्या
लोणी : राहाता तालुक्यातील प्रवरानगर (लोणी खुर्द )येथे दोन दिवसांत दोन जणांनी वैफल्यग्रस्त झाल्याने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
बुधवारी (दि.२४)रात्री मोहन शिवाजी शिरसाठ (वय ४५ वर्ष) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेतला. शिरसाठ हे लोणी येथील चित्रालय चौकात मध्ये एका गँरेजमध्ये काम करत होते. गुरूवारी (दि.२५) सकाळी प्रवरानगर येथे चटई चाळीत राहात असलेल्या चांगदेव किसन भंडागे(वय ५०) यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
भंडागे हे विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात हंगामी कामगार होते. त्यांचे मुळ गाव राहाता तालुक्यातील आडगांव बुद्रूक हे आहे. या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली याबाबत लोणी पोलिस तपास करत आहेत.
वैफल्यग्रस्त भावनेतून या दोघांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत लीणी पोलिस ठाण्यात या दोन्ही आत्महत्येबाबत अकास्मात मृत्यू नोंद केली असून पुढील तपास स.पो.नि.प्रकाश पाटील हे करत आहेत.