कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:39 IST2018-08-02T16:39:04+5:302018-08-02T16:39:30+5:30
मारूती अल्टो (क्रमांक एम. एच. १२ ए. टी. ४५९५) कारची धडक बसून यामाहा क्रुक्स मोटारसायकलवरील परसराम रामदास ताके (वय ४५,रा. जेऊरहैबती, ता. नेवासा) हे जागीच ठार झाले.

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
भेंडा : मारूती अल्टो (क्रमांक एम. एच. १२ ए. टी. ४५९५) कारची धडक बसून यामाहा क्रुक्स मोटारसायकलवरील परसराम रामदास ताके (वय ४५,रा. जेऊरहैबती, ता. नेवासा) हे जागीच ठार झाले.
बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान नेवासा शेवगाव रस्त्यावर भायगाव शिवारातील दुकळे वस्तीजवळ ही दुर्घटना घडली. ताके हे त्यांची सासूरवाडी खरडगाव (ता. शेवगाव) येथून नवीन विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून घरी परतत होते. रात्री समोरून येणाऱ्या अल्टो कारचा प्रखर प्रकाशझोत डोळ्यावर आल्याने दोन्ही वाहनांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. ही धडक एवढी जोराची होती की कारची धडक बसल्यानंतर ताके हे दुचाकीवरून उंच उडून खाली पडले. त्यांच्या डोक्यास व छातीस जोरदार मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नेवासा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे दोन आई,पत्नी, भाऊ, भावजय,२ मुली, १ मुलगा, पुतणी, पुतणे असा परिवार आहे. कुकाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस.व्ही.गायकवाड तपास करीत आहेत.