चार वाहनांच्या अपघातात दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:33+5:302021-07-29T04:22:33+5:30
तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून भारत मारुती डोंगरे व त्यांचा भाचा तेजस विलास सानप हे निमोणच्या ...

चार वाहनांच्या अपघातात दोघे गंभीर जखमी
तळेगाव दिघेमार्गे असलेल्या लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून भारत मारुती डोंगरे व त्यांचा भाचा तेजस विलास सानप हे निमोणच्या दिशेने प्रवास करीत होते. दरम्यान, समोरून आलेल्या व लोणीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रक (केए ०१, एबी ९८२२) व दुचाकीची (एमएच १७, बीई ०६६५) हॉटेल आराध्यासमोर धडक होत अपघात झाला. त्याचवेळी मालवाहू ट्रकला पाठीमागून आयशर ट्रक (एमएच ०९, ईएम १४४६) धडकला. त्यापाठोपाठ आयशर ट्रकला टेम्पो (एमएच १७, बीवाय ८६०१) धडकला.
या अपघातात दुचाकीवरील भारत मारुती डोंगरे (वय ३५, रा. सोनेवाडी ता. संगमनेर ) व त्यांचा भाचा तेजस विलास सानप (वय १३ वर्षे, रा. तिगाव, ता. संगमनेर ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघाही जखमींना तातडीने संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांनी अपघात प्रसंगी मदतकार्य केले. अपघाताच्या घटनेबाबत रहिवाशांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानंतर तळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस नाईक बाबा खेडकर व यमना जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. अपघातात दुचाकीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.
फोटो : २८ तळेगाव दिघे शिवारात एकमेकांना धडकून चार वाहनांचा असा विचित्र अपघात झाला.