बांधाच्या वादातून दोघांना मारहाण

By | Updated: December 8, 2020 04:17 IST2020-12-08T04:17:30+5:302020-12-08T04:17:30+5:30

कोपरगाव : शेतातील सामाईक बांधाच्या वादातून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून दोघांना शिवीगाळ करून कोयता, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण ...

The two were beaten over a dam dispute | बांधाच्या वादातून दोघांना मारहाण

बांधाच्या वादातून दोघांना मारहाण

कोपरगाव : शेतातील सामाईक बांधाच्या वादातून झालेल्या भांडणात तिघांनी मिळून दोघांना शिवीगाळ करून कोयता, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने मारहाण करीत जखमी केले आहे.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे रविवारी (दि.६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. यात गणेश शशिकांत कासार व ललित सीताकांत कासार हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी गणेश शशिकांत कासार (रा. मायगाव देवी, ता. कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून राकेश रामचंद्र खांडगौरे (कासार), अंकुश रामचंद्र खांडगौरे (कासार), रामचंद्र रंगनाथ खांडगौरे (कासार, तिघे रा. मायगाव देवी, ता. कोपरगाव) या तिघांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सी. एस. तोर्वेकर हे करीत आहेत.

Web Title: The two were beaten over a dam dispute