राहुरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 13:42 IST2018-04-27T13:42:27+5:302018-04-27T13:42:33+5:30
तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
राहुरी : तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
चिखलठाण येथून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. ही वाळू वाहतूक ट्रक, टेम्पोच्या साहाय्याने म्हैसगाव मार्गे केली जाते. या रस्त्यावर टेहाळणी करणाऱ्याच्या भरवशावर रात्रीबरोबर दिवसाही बिनधास्तपणे वाळू वाहतूक केली जाते. याची माहिती तहसिलदार यांना मिळताच गुरुवारी सकाळी टेहाळणी करणारी यंत्रणा भेदून ही कारवाई केली. यामध्ये म्हैसगावजवळ वाळू वाहतूक करणारा एक ट्रक तर ठाकरवाडीजवळ एक टेम्पो पकडला. दोन्हीही वाहने क्रमांकाविना वाळू वाहतूक करीत होते. या पथकामध्ये तहसिलदार अनिल दौंडे, अव्वल कारकून दत्ता गोसावी, लिपीक कृष्णा सावळे, पोलीस कॉस्टेबल मनोज राऊत, चालक माऊली राऊत हे सहभागी होते. पकडलेली दोन्हीही वाहने तहसिल कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.