अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी २४ तासांत २ हजार २० रुग्ण बाधित आढळून आले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ७६६ इतकी झाली आहे. अहमदनगर शहर, राहाता आणि संगमनेर हे हॉटस्पॉट ठरले आहेत. दरम्यान, २४ तासांत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७६३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६० आणि अँटिजन चाचणीत ३९७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (६२२), राहाता (२१४), संगमनेर (२०५), अकोले (१६१), पाथर्डी (११७), नगर ग्रामीण (११६), कोपरगाव (१०६), श्रीरामपूर (१०५), राहुरी (९०), शेवगाव (६५), नेवासा (५२), पारनेर (४७), भिंगार (४५), इतर जिल्हा (३९), जामखेड (१८), श्रीगोंदा (१), कर्जत (५), इतर राज्य (२), मिलिटरी हॉस्पिटल (१). एकूण (२०२०).
-------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : ९३,४९५
उपचार सुरू असलेले रूग्ण : १०,७६६
मृत्यू : १,२५५
एकूण रुग्णसंख्या : १,०५,५१६