ताजणे मळ्यातून दोन तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 23:52 IST2016-03-13T23:49:23+5:302016-03-13T23:52:54+5:30
संगमनेर : शहर पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी शहरातील ताजणे मळा परिसरात छापा टाकून २ तलवारी जप्त केल्या.

ताजणे मळ्यातून दोन तलवारी जप्त
संगमनेर : शहर पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी दुपारी शहरातील ताजणे मळा परिसरात छापा टाकून २ तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
ताजणे मळा परिसरात राहणारे साईप्रसाद उदय दाणी व गोरख नारायण गाडेकर यांच्या घरात तलवारी असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला कळाली. त्यानुसार रविवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस हेड कॉन्स्टेबल ईस्माइल शेख, कॉन्स्टेबल महेश कचे, धनंजय हासे, भीमराव पवार यांच्या पथकाने ताजणे मळ्यात छापा टाकून २ तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध भारतीय हत्यारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
(प्रतिनिधी)