दूरगावात दोन तोंडाचे विचित्र कालवड
By Admin | Updated: August 3, 2014 01:10 IST2014-08-03T00:00:24+5:302014-08-03T01:10:10+5:30
कर्जत : दोन तोंडे, चार डोळे, दोन जीभ, दोन स्वतंत्र मेंदू असलेली विचित्र कालवड तालुक्यातील दूरगाव येथे जन्मली. गायीवरील शस्त्रक्रियेनंतर कालवडीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले.
दूरगावात दोन तोंडाचे विचित्र कालवड
कर्जत : दोन तोंडे, चार डोळे, दोन जीभ, दोन स्वतंत्र मेंदू असलेली विचित्र कालवड तालुक्यातील दूरगाव येथे जन्मली. गायीवरील शस्त्रक्रियेनंतर कालवडीला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले. ही कालवड दोन्ही तोंडाने दूध पिते हे विशेष.
दूरगाव येथील शेतकरी बशिर हुसेन शेख यांची ही गाय आहे. प्रसुतीचा कालावधी पूर्ण होऊनही प्रसुतीत अडचण येत असल्याने भिगवन (जि.पुणे) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष भारती यांनी गर्भतपासणी केली असता गायीच्या पोटात दोन तोंडाचे वासरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नैसर्गिक प्रसुती जिकीरीची व गाईच्या जिवाला धोकाअसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी गायीवर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेनंतर गायीने दोन तोंडाच्या कालवडीला जन्म दिला. या कालवडीला ४ डोळे, दोन जीभ, २ तोंड, दोन कान, दोन मेंदू आहेत. विशेष म्हणजे हे कालवड दोन्ही तोंडाने दूध पिते. या विचित्र कालवडीला पहाण्यासाठी गर्दी होत आहे.
गुणसुत्रातील जनुकांच्या बदलामुळे विचित्र जीव जन्माला येतात, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भारती यांनी सांगितले.
या शस्त्रक्रियेत त्यांना डॉ.राहुल परदेशी, डॉ.विक्रम माऊलकर, डॉ.बापू पोटरे, डॉ.आप्पा शिंदे यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)