ब्राह्मणवाड्यात दोन दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 17:46 IST2017-11-13T17:46:34+5:302017-11-13T17:46:54+5:30
ब्राम्हणवाडा : ब्राह्मणवाड्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने किरकोळ ...

ब्राह्मणवाड्यात दोन दुकाने फोडली
ब्राम्हणवाडा : ब्राह्मणवाड्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने किरकोळ मुद्देमाल वगळता चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
गावातील मुख्य चौकात डॉ. प्रदीप कुमकर यांचे मेडिकल स्टोअर आहे. त्यांच्याशेजारी विकास आरोटे यांचे किराणा दुकान आहे. पहाटे ३ च्या सुमारास दोन ते तीन चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर कटावणीने उचकटून आत प्रवेश केला. डॉ. कुमकर यांच्या मेडिकल दुकानात असणाºया सीसीटीव्ही कॅमेºयात दोन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. एक जण दुकानाबाहेर दिसतो, दुस-याने आत प्रवेश करून उचकापाचक केली. मात्र विशेष काही न मिळाल्याने सौंदर्यप्रसाधने व किरकोळ रक्कम घेऊन त्यांनी शेजारच्या दुकानाकडे मोर्चा वळविला. तिथेही शटर उचकटून किरकोळ मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. यासंदर्भत अकोले पोलिसांशी संपर्क केला असता गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले.