माहिजळगाव येथे टँकर, ट्रक अपघातात २ जण ठार, तीन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:01 IST2018-02-14T18:44:33+5:302018-02-14T19:01:07+5:30
पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

माहिजळगाव येथे टँकर, ट्रक अपघातात २ जण ठार, तीन गंभीर जखमी
माहिजळगाव : पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
युवराज धनाजी डाडर (वय २३, टँकर चालक, रा. पाटेगाव ) व ट्रक चालक (नाव समजू शकले नाही) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पाटेगााव येथून हा टँकर माहिजळगावकडे जात होता तर ट्रक पाटेगावच्या दिशेने जात होता. माहिजळगाव येथे या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोराची धडक होऊन दोन जण जागीच ठार तर अशोक डाडर,दादा दळवी, जनार्धन डाडर हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण टँकरमधील प्रवासी आहेत. त्यांच्यावर माहिजळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरुआहेत.
दरम्यान, ही धडक एवढी जोराची होती की ट्रक चालक केबिन व स्टेअरिंगमध्ये अडकला होता. जेसीबीच्या साह्याने त्याला बाहेर काढण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.