संगमनेर तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 20:30 IST2018-01-21T20:30:11+5:302018-01-21T20:30:46+5:30

संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुंजेवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी नर व मादी जातीचे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. बिबट्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Two leopards die in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

संगमनेर तालुक्यात दोन बिबट्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बोटा (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुंजेवाडी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी नर व मादी जातीचे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले. बिबट्यांच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंजेवाडीच्या चौधरीमळा येथील डाळिंबाच्या बागेत रविवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत असल्याचे परिसरातीस शेतक-याने पाहिले. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरातील पांडोबा ओढ्याजवळ शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मेंढपाळाला अन्य एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. वन विभागाने या मृत बिबट्यांचे पंचनामे केले असून त्यातील एक नर जातीचा दोन वर्षे वयाचा, तर अन्य मादी जातीचा एक वर्षे वयाचा असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे.

Web Title: Two leopards die in Sangamner taluka