दोन लाखांची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:36 IST2018-06-16T17:35:55+5:302018-06-16T17:36:11+5:30
मोटारसायकलवर आलेल्या दोघा अनोखळी चोरट्यांनी पादचाºयाच्या हातातील दोन लाख रूपये असलेली बॅग लांबवली. गुरूवारी दुपारी सव्वाबारा वाजता ही घटना घडली.

दोन लाखांची रोकड पळवली
अहमदनगर : मोटारसायकलवर आलेल्या दोघा अनोखळी चोरट्यांनी पादचाºयाच्या हातातील दोन लाख रूपये असलेली बॅग लांबवली. गुरूवारी दुपारी सव्वाबारा वाजता ही घटना घडली.
अविनाश सुरेश पाटील (रा. आनंदधाम, नगर) यांनी गुरूवारी (दि. १४) दुपारी १२ वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून १ लाख ९५ हजार रूपये काढले. ही रक्कम एका बॅगेत भरून ते त्यांच्या चारचाकी वाहनातून महात्मा फुले चौकातून सारसनगर पुलाजवळ आले. तेथे वाहन उभे करून ते रोकड असलेली बॅग घेऊन तेथीलच करपे मळ्यातील एका मित्राकडे पायी निघाले असता, त्यांच्यावर पाळत ठेवून मोटारसायकलवर आलेल्या दोघाजणांनी त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून चोरून नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अविनाश पाटील यांच्या फिर्यादीवरून भांदवि ३९२, ३४ प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी नागवे करीत आहेत.