लोणी व्यंकनाथमध्ये दोन लाखांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:19 IST2021-02-07T04:19:46+5:302021-02-07T04:19:46+5:30

श्रीगोंदा : वीजमीटरमध्ये वीज युनिटची नोंद होणार नाही, अशी व्यवस्था करून २ लाख २१ हजार रुपये किमतीची एक लाख ...

Two lakh electricity theft in Loni Venkanath | लोणी व्यंकनाथमध्ये दोन लाखांची वीजचोरी

लोणी व्यंकनाथमध्ये दोन लाखांची वीजचोरी

श्रीगोंदा : वीजमीटरमध्ये वीज युनिटची नोंद होणार नाही, अशी व्यवस्था करून २ लाख २१ हजार रुपये किमतीची एक लाख एक हजार २४२ युनिटची वीजचोरी केली. याप्रकरणी धर्मराज संपतराव काकडे, मोहम्मद सद्दाम शेख, अमीर रज्जाक (सर्व रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची फिर्याद कार्यकारी अभियंता प्रदीप राधेशाम सावंत यांनी दिली.

धर्मनाथ काकडे यांचे लोणीव्यंकनाथ गावात व्यापारी संकुल आहे. काकडे यांनी सर्व गाळे भाड्याने दिले आहेत. गाळेधारकांनी विजेची चोरी केल्याचा ठपका महावितरण कंपनीने तिघांवर ठेवला आहे.

धर्मनाथ काकडे म्हणाले, आपण गाळे भाड्याने दिले आहेत. त्यामुळे वीज कशी वापरली जात होती, याची कल्पना नाही.

Web Title: Two lakh electricity theft in Loni Venkanath