आरोळे कोविड हॉस्पिटलला दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:54+5:302021-04-21T04:21:54+5:30
कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. आरोळे हॉस्पिटल येथे सध्या ८० ऑक्सिजन बेड आहेत. ते सर्व फुल्ल ...

आरोळे कोविड हॉस्पिटलला दोन लाखांची मदत
कोरोना रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणावर लागते. आरोळे हॉस्पिटल येथे सध्या ८० ऑक्सिजन बेड आहेत. ते सर्व फुल्ल झाले आहेत. येथील ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परसराम कोकणी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी बाजार समितीत जाऊन व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आरोळे हॉस्पिटलला मदतीचे साकडे घातले.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश जरे यांनी स्वतः प्रशासनासमवेत फिरून व्यापारी वर्गाला मदतीची विनंती केली. व्यापारी वर्गाने अवघ्या १ तासात २ लाख १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. यामुळे ऑक्सिजन बेड वाढविण्यास मदत होईल. अनेक कोरोना रुग्णांचा जीव वाचेल.
प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने दातृत्वाचा दाखला दिला आहे. अशाच प्रकारे सहकार्य सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृृतिक, व्यापारी नागरिकांनी पुढे येऊन या कोविड सेंटरला यथाशक्ती मदत करावी, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
...............
२० जामखेड आरोळे हॉस्पिटल
आरोळे कोविड हॉस्पिटलला व्यापारी यांच्या वतीने दिलेला मदतीचा धनादेश स्वीकारताना तहसीलदार विशाल नाईकवाडे, नगर परिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आदी.