शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

देवराईमध्ये बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 09:53 IST

पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी सकाळी सहा वाजता बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.

पाथर्डीपाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी (5 सप्टेंबर) सकाळी सहा वाजता बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नींचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी महामार्ग विकसित करणाऱ्या ठेकेदार आर.बी.के कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकाळी सहापासून रास्तारोको सुरु केला आहे. 

देवराई गावाजवळ नगरकडून पाथर्डीकडे जाणारी बस व पाथर्डीहून नगरला जात असलेल्या मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील राहुल महादेव राठोड (28) आणि मनिषा राहुल राठोड (25) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. संतप्त नागरिकांनी अॅड.सतीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली  महामार्गाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत रास्तारोको सुरु केला. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा एक किलोमीटर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत करून देण्यासाठी आंदोलकांशी बोलणी सुरु केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी