शिर्डीत वेगवेगळ्या घटनेत दोन जखमी
By Admin | Updated: April 20, 2015 13:13 IST2015-04-20T01:41:07+5:302015-04-20T13:13:35+5:30
शिर्डी : शिर्डीत शनिवारी रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत एक अठरा वर्षाचा युवक व एक महिला गंभीर जखमी झाले़ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या देवीदास कसबे या युवकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर नाशिक येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ तर अन्य एका घटनेत जखमी झालेल्या शेवंताबाई बाबासाहेब पिंपळे या महिलेवरही साईबाबा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़

नाशिक येथील देवीदास कसबे (वय १८) हा शिर्डीत फोटो लॉकेट विकण्याचा व्यवसाय करतो़ तो रात्री अकराच्या दरम्यान साईबाबा मंदीर प्रवेशद्वारसमोर उभा असताना संदीप वाकचौरे व सुरेश पवार यांनी देवीदासला धारदार हत्याराने मारहाण केली. गंभीर अवस्थेतील देवीदासला उपचारासाठी प्रथम साईबाबा रूग्णालय व नंतर नाशिकला हलवण्यात आले़ पोलिसांनी संदीप वाकचौरे यास रात्रीच अटक केली असून अन्य दोघे फरार आहेत़
दुसरी घटना निमगाव शिवारात देशमुख हॉस्पिटल समोर रात्री साडेदहाच्या सुमारास घडली़ भांडणे सोडवायला गेलेल्या शेवंताबाई पिंपळे हाणामारीत जखमी झाल्या. (तालुका प्रतिनिधी)