चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेसह दोन मुली जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 18:20 IST2017-08-19T18:20:37+5:302017-08-19T18:20:37+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील चंद्रकांत पंधरकर व सतीश पंधरकर यांच्या घरी जबरी चोरी होऊन चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाखाचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह दोन मुली जखमी झाल्या. शनिवारी पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली.

two girls with women injured in theft attack | चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेसह दोन मुली जखमी

चोरट्यांच्या हल्ल्यात महिलेसह दोन मुली जखमी

रट्यांच्या हल्ल्यात महिलेसह दोन मुली जखमीपिंपळगाव पिसा येथील घटना : लाखाचा ऐवज लांबविलाश्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील चंद्रकांत पंधरकर व सतीश पंधरकर यांच्या घरी जबरी चोरी होऊन चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाखाचा ऐवज लांबविला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिलेसह दोन मुली जखमी झाल्या. शनिवारी पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. पिंपळगाव पिसा येथे कालव्याच्या बाजूला चंद्रकांत पंधरकर व सतीश पंधरकर शेजारी रहातात. नेहमीप्रमाणे हे दोन्ही कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. पहाटे एकच्या दरम्यान चंद्रकांत पंधरकर यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व घरातील सर्वांना धमकावत एका कोपºयात बसविले. व ओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी चंद्रकांत पंधरकर यांच्या पत्नीच्या अंगावरील दीड तोळ्याचे दागिने ओरबडून घेतले. चंद्रकांत पंधरकर यांच्या खिशातील आठ हजार रुपयांची रोकडही लुटण्यात आली. घरातील सामानाची उचकापाचक करुन चोरट्यांनी आपला मोर्चा सतीश पंधरकर यांच्या घराकडे वळविला. सतीश पंधरकर यांच्या घरात प्रवेश करताच संगीता पंधरकर यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबडून घेतले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत संगीता यांच्या कानाला दुखापत झाली.आईच्या आवाजाने जाग्या झालेल्या गौरी व कोमल या मुलींनाही चोरट्यांनी मारहाण केली. यामध्ये गौरीचा हात मोडला तर कोमल हिच्या पोटावर गजाने मारहाण करण्यात आली. सतीश पंधरकर यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून पन्नास हजार रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे. ---------------------------------------------------------------------------------------------------चोरटे जीन पॅन्टीतप्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार चोरटे २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी अंगावर टी- शर्ट, जीन्स पॅन्ट घातली होती. ते मराठी व हिंदीतून बोलत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नगर येथील श्वान पथकाने घटनास्थळापासून एक कि.मी. अंतरापर्यंत माग काढला. जवळच्या उसाच्या शेतात पंधरकर यांचे दोन्ही मोबाईल संच आढळून आले.

Web Title: two girls with women injured in theft attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.