शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

मिरवणुकीत डीजेच्या वाहनाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

By शेखर पानसरे | Updated: January 4, 2024 21:46 IST

विवाह सोहळ्यासाठी जात होता नवरदेव ; सहा जणांना दुखापत, जखमींवर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

संगमनेर : साखरपुडा, हळद आणि विवाह सोहळ्यासाठी त्याच्या गावातून नवरदेव जात असताना मिरवणूक सुरू होती, त्यावेळी तेथे डीजे वाजत होता. डीजे  वाहन चालकाचे  वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्या वाहनाखाली मिरवणुकीला उपस्थित असलेले काही चिरडले गेले, काहींना वाहनाचा धक्का लागला. यात दोघांचा मृत्यू झाला. सहा जणांना दुखापत झाली आहे. त्यांच्यातील काहींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी (दि.०४) दुपारी ४.३० सुमारास तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात घडली. 

बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८), भास्कर राधू खताळ (वय ७३) अशी मयतांची नावे आहेत. अभिजीत संतोष ठोंबरे (वय २२), रामनाथ दशरथ काळे (वय ६५), गोरक्ष पाटीलबा खताळ, सोपान राबवा खताळ, भारत भागा खताळ, सागर शंकर खताळ अशी (सर्व रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर) अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे-पाटील, पोलिस हेड कॉस्टेबल अमित महाजन हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात