दोन कोटींचा गुटखा पकडला
By Admin | Updated: March 3, 2017 19:10 IST2017-03-03T19:10:57+5:302017-03-03T19:10:57+5:30
नगरजवळील विळदघाट येथे अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने छापा टाकून दोन कोटींचा गुटखा जप्त केला.

दोन कोटींचा गुटखा पकडला
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 03 - नगरजवळील विळदघाट येथे अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या पथकाने छापा टाकून दोन कोटींचा गुटखा जप्त केला. ट्रकसह सर्व मुद्देमालाची किमत सव्वा दोन कोटीची असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.
हैदराबाद येथून ट्रक भरुन गुटखा पुण्याच्या दिशेने जात असल्याची माहिती माहिती पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विळदघाट येथे वाहनांची तपासणी सुरु केली. या तपासणीत एका ट्रकमध्ये सुमारे दोन कोटींचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी ट्रकसह गुटखा हस्तगत केला असून, दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.