खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST2021-06-27T04:15:05+5:302021-06-27T04:15:05+5:30
कौठेकमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीकच्या खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान जालिंदर भडांगे व सुरेश जालिंदर भडांगे ही भावंडे शेळ्या ...

खाणीतल्या विहिरीतील पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू
कौठेकमळेश्वर ते निळवंडे रस्त्यानजीकच्या खिंड शिवारात दगड खाण आहे. समाधान जालिंदर भडांगे व सुरेश जालिंदर भडांगे ही भावंडे शेळ्या पाणी पाजण्यासाठी खाणीकडे गेले होते. दरम्यान, शेळी पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी समाधान भडांगे हा पाण्यात उतरला असता तो पाण्यात बुडाला. भाऊ पाण्यात बुडाल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी सुरेश भडांगे हा चिमुकला पाण्यात उतरला असता दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबत असलेल्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कौठेकमळेश्वर गावात घटनेची माहिती दिली.
उपसरपंच नवनाथ जोंधळेसहित पदाधिकारी व ग्रामस्थांनी खाणीकडे धाव घेतली. घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत घटनेची खात्री करत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाण्यातून दोघाही मुलांचे मृतदेह बाहेर काढले व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविले. समधान भडांगे हा पाचवीत, तर सुरेश भडांगे हा तिसरीत शिकत होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.
फोटो -
समाधान भडांगे
सुरेश भडांगे