भागवतवाडीत दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:26+5:302021-01-23T04:21:26+5:30
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गत असलेल्या भागवतवाडी या ठिकाणी रात्रीच्यावेळी चोरट्यांनी घरांचे दरवाजे व कुलुपे तोडून ...

भागवतवाडीत दोन
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गत असलेल्या भागवतवाडी या ठिकाणी रात्रीच्यावेळी चोरट्यांनी घरांचे दरवाजे व कुलुपे तोडून दोन ठिकाणी घरफोड्या केल्या. एका ठिकाणी चोरट्यांना काही हाती लागले नाही, तर दुसऱ्या ठिकाणाहून चोरट्यांनी किमती साड्या व कपडे लंपास केले. शुक्रवारी (दि. २२) रात्री ३ वाजेच्या सुमारास या घरफोडीच्या घटना घडल्या, त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
भागवतवाडी या ठिकाणी ह.भ.प. वाळिबा महाराज भागवत राहतात. ते घराच्या एका खोलीत झोपलेले होते व दुसरी खोली दरवाजास कुलूप लावून बंद केली होती. चोरट्यांनी बंद खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत साहित्याची उचकापाचक केली. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले. दरम्यान, वाळिबा महाराज भागवत जागे झाले. त्यानंतर चोरटे पसार झाले. भागवत महाराज यांनी वस्तीवर राहणारा आपला मुलगा शरद भागवत यास मोबाइलवरून माहिती दिली. तोपर्यंत चोरट्यांनी वामनवाडी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या दत्तू गजानन भागवत यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथून चोरट्यांनी घरातील पेट्या व बॅगा उचलून नेल्या व नजीकच्या डाळिंब बागेत जाऊन उचकापाचक केली व किमती साड्या व कपडे लंपास केले. तोपर्यंत रहिवासी जागे झाल्याने चोरटे पसार झाले होते. भागवतवाडी येथे दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घरफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी भागवतवाडी येथे जाऊन घटनेची माहिती घेतली आहे.
फोटो : २२चोरी
तळेगाव दिघे : गावांतर्गत असलेल्या भागवतवाडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी घरांचे दरवाजे व कुलुपे तोडून दोन ठिकाणी घरफोड्या करीत पेट्यांची अशी उचकापाचक केली.