सहा महिन्यातच अडीच कोटी ‘खड्ड्यात’ : पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्ता उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:29 IST2018-09-27T17:29:35+5:302018-09-27T17:29:39+5:30
कोपरगाव-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्त्यावर खर्च झालेले अडीच कोटी रुपये अवघ्या सहाच महिन्यात ‘खड्ड्यात’ गेला आहे.

सहा महिन्यातच अडीच कोटी ‘खड्ड्यात’ : पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्ता उखडला
कोपरगाव : कोपरगाव-श्रीरामपूर राज्य मार्गावरील पुणतांबा फाटा ते शिंगवे रस्त्यावर खर्च झालेले अडीच कोटी रुपये अवघ्या सहाच महिन्यात ‘खड्ड्यात’ गेला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून साईडपट्ट्याही खचल्या आहेत.
कोपरगावाहून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या राज्य मार्गावर प्रवाशांसह हजारो वाहनांची दररोजची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगावच्या माधमातून देखभाल दुरुस्तीचे काम केले जातात. या रस्त्याचे मागील मार्च महिन्याच्या शेवटी अडीच कोटी खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु या कामाचा दर्जा आजची रस्त्याची अवस्था पाहिल्यास लक्षात येतो. सहा महिन्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता जवळपास अर्धा ते एक फूटांपर्यत खचला आहे. तर काही ठिकाणी लांबच लांब खळग्या पडल्या आहेत. साईडपट्ट्याही खचल्या आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या अधिका-यांचेही दुर्लक्ष झाले आहे.