व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद

By शिवाजी पवार | Updated: August 22, 2023 14:46 IST2023-08-22T14:46:03+5:302023-08-22T14:46:23+5:30

दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते. 

Two accused who robbed a businessman were jailed within 24 hours | व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद

व्यावसायिकाला लुटणारे दोघे आरोपी चोवीस तासांत जेरबंद

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात खुर्च्या विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील व्यावसायिकाला चाकूने जखमी करून त्याच्याकडे पैसे व मोबाईल लुटणाऱ्या दोन अटल चोरांना शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह जेरबंद केले.

आरोपींमध्ये तंजील गफारखान (वय २५, रा. हुसेननगर) व आकाश दिनकर सौदागर (वय २३, सिद्धार्थनगर) यांचा समावेश आहे. दोघांनी शहरातील सरस्वती कॉलनी परिसरामध्ये राजू हरजी बंजारा (ह. मु येसगाव, ता.कोपरगाव) याला लुटले होते. 

 परिसरात खुर्ची विकण्यासाठी फेरी मारत असताना आरोपींनी बंजारा याला दमबाजी केली. त्याला कालव्याच्या बाजूला नेले. तेथे चाकूने त्याच्या हातावर वार करून खिशातील दीड हजार रुपये रक्कम व सात हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला. घटनेनंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. दोघांनीही टोपी घातल्यामुळे त्यांची ओळख पटली नव्हती.
 मात्र पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन आरोपींचा शोध घेतला. त्यात खान व सौदागर यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.

दोघेही शहरातील कांदा मार्केट परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
   दोघांनीही गुन्ह्याची कवली दिली. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.

Web Title: Two accused who robbed a businessman were jailed within 24 hours