रस्तालुटीतील दोघा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:09 IST2018-09-30T17:09:02+5:302018-09-30T17:09:07+5:30
वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी अटक केली़ प्रकाश दशरथ भिंगारदिवे (रा़ भिंगार) व संदीप परशूराम वाकचौरे (रा़ दरेवाडी) अशी दोघांची नावे आहेत़

रस्तालुटीतील दोघा आरोपींना अटक
अहमदनगर: वाहनचालकांना अडवून त्यांना मारहाण करत लूट करणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी अटक केली़ प्रकाश दशरथ भिंगारदिवे (रा़ भिंगार) व संदीप परशूराम वाकचौरे (रा़ दरेवाडी) अशी दोघांची नावे आहेत़
तळेगाव (जि़ बीड) येथील बाप्पासाहेब अप्पाराव चव्हाण हे दुधाचा टँकर घेऊन क्लिनर गोकूळ राजगुरू याच्यासह २७ सप्टेंबर रोजी नगर-सोलापूर रोडवरून मुंबईच्या दिशेने जात होते़ रात्री साडेआकरा वाजता टँकर सोलापूर रोडवरील मुठा चौक नाल्याजवळ येताच भिंगारदिवे व वाकचौरे यांनी टँकर अडविला़ चव्हाण व राजगुरू यांना चाकू चा धाक दाखवून त्यांच्याकडील एक मोबाईल व ५ हजार रूपये हिसकावून नेले़
याबाबत चव्हाण यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती़ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकासह लूटारूंचा शोध घेऊन त्यांना भिंगार परिसरातून अटक केली़ ही कारवाई पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील, सहाय्यक निरीक्षक संजय कवडे, कॉन्स्टेबल मुळे, पवार, राजेंद्र सुद्रिक, वनवे, द्वारके यांच्या पथकाने केली़