बावीस गावांचा विरोध

By Admin | Updated: July 18, 2014 01:44 IST2014-07-18T01:41:27+5:302014-07-18T01:44:05+5:30

राहुरी : मुळा व प्रवरा नदीकाठावरील ३० गावांमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत २२ गावांनी वाळू लिलावास विरोध दर्शविला

Twenty-two opposing villages | बावीस गावांचा विरोध

बावीस गावांचा विरोध

राहुरी : मुळा व प्रवरा नदीकाठावरील ३० गावांमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत २२ गावांनी वाळू लिलावास विरोध दर्शविला, तर ८ गावांनी मात्र संमती दिली. विरोध असणाऱ्या गावांमध्ये प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा २१ जुलैपासून सभा घेण्यात येणार आहेत़
राहुरीच्या तहसीलदार राजश्री आहिरराव व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरूवारी वाळू लिलाव निर्णयासंदर्भात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते़ वाळूचा लिलाव झाला तर शेती व्यवसाय उध्दवस्त होईल़ विहिरी कोरड्या पडत आहेत, तसेच वाळूतस्कर दमदाटी करतात त्यामुळे २२ ग्रामसभांत विरोधी सूर आळविण्यात आला़ वाळू तस्करांना आळा घालण्याची मागणीही अनेक ठिकाणी करण्यात आली़ सध्या होत असलेल्या वाळू उचलेगिरीविरूध्द कडक धोरण घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.
देसवंडी, कोल्हार, सोनगाव, सात्रळ, धानोरे, चिखलठाण, चिंचोली, अंमळनेर, केसापूर, चांदेगाव, करजगाव, ब्राम्हणगाव भांड, तांदुळवाडी, पाथरे, मांजरी, मालुंजे, वांजूळपाई, तिळापूर, कोपरे, कोंढवड, केंदळ, मानोरी, मांजरी या गावांनी ग्रामसभेत वाळूलिलावास विरोध दर्शवला. तर दवणगाव, आंबी, शिलेगाव, राहुरी, म्हैसगाव, दरडगाव, लाख, जातप या गावांची लिलावास हरकत नाही.
(तालुका प्रतिनिधी)

मुळा व प्रवरा नदीकाठावरील ३० गावांमध्ये वाळू लिलावासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आल्या़ नकारात्मक असलेल्या २२ गावांच्या ग्रामसभा प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहेत. वाळू उचलली तर पाण्याचा प्रश्न गंभीर होईल असे विरोध करणाऱ्या गावकऱ्यांचे म्हणणे होते़
- राजश्री आहिरराव, तहसीलदार,राहुरी

Web Title: Twenty-two opposing villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.