बस उलटल्याने बारा विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: July 23, 2016 00:14 IST2016-07-23T00:04:36+5:302016-07-23T00:14:41+5:30
संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला.

बस उलटल्याने बारा विद्यार्थी जखमी
संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला.
संगमनेर आगाराचीएम.एम. ०७ सी. ७३४७ क्रमांकाची बस प्रवासी घेऊन मिर्झापूरहून संगमनेरकडे येत असताना एका उतारावर चालक अमोल एकनाथ धनवटे याचा ताबा सुटला. मिर्झापूर शिवारातील स्मशानभूमीजवळ ही बस पलटी झाली. या बसमध्ये प्रवाशांबरोबरच मिर्झापूर व नांदूरीदुमाला येथील शालेय विद्यार्थी प्रवास करीत होते. बस उलटी झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. बसमधील १२ विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांच्या हाता पायाला किरकोळ जखमा झाल्या. ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्वरित उपचारासाठी संगमनेरातील खाजगी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघाताची माहिती मिळताच लगतच्या गावातील पालकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची फिर्याद निशा राजेंद्र वाकचौरे हिने तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अपघातातील जखमी विद्यार्थी
या अपघातात निशा राजेंद्र वाकचौरे (वय १८), भाग्यश्री ज्ञानेश्वर वलवे (वय १६), स्वाती मारूती कवडे (वय १८), आकांक्षा नवनाथ मदने (वय १६), राजेंद्र शिवाजी मदने (वय १७), अविनाश रेवजी नेहे (वय १७), अनिल शंकर शिंदे (वय १७), सचिन सयाजी वलवे (वय १८), सुधीर बाळासाहेब वलवे (वय १७), सुशिल नामदेव हांडे (वय १७) संकेत अनिल वलवे (वय १७) या विद्यार्थ्यांसह चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.