बारा लाख सातबारा उतारे आता ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST2021-07-23T04:14:26+5:302021-07-23T04:14:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील सातबारा उतारे आता ऑनलाइन पाहता येणार आहेत. १२ लाख ७७ हजार सातबारे उतारे ...

Twelve million seventeen excerpts now online | बारा लाख सातबारा उतारे आता ऑनलाइन

बारा लाख सातबारा उतारे आता ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यातील सातबारा उतारे आता ऑनलाइन पाहता येणार आहेत. १२ लाख ७७ हजार सातबारे उतारे संगणकीकृत झाले असून, त्यातील सात हजार उताऱ्यांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी विशेष शिबिरांच्या माध्यमातून दुरुस्त करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक खातेदाराला त्यांचा उतारा आता संकेतस्थळावर तपासून घेता येणार आहे.

कोरोनातून थोडा दिलासा मिळाल्याने महसूल यंत्रणा पुन्हा एकदा आपल्या मूळ कामाकडे वळाली आहे. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिक कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने साताबारा उतारा संगणकीकृत करण्याचे काम हाती घेतले होते. आतापर्यंत १२ लाख ७७ हजार उतारे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. संगणकीकृत उताऱ्यांचे हे काम १०० टक्के पूर्ण झाल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी सांगितले. काही संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमध्ये काही चुका किंवा त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक खातेदार ई-मेलद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे अडचणी सांगत आहेत. काही खातेदारांनी ई-हक्कप्रणालीद्वारे सातबारा उताऱ्यामधील दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केला आहे. संगणकीकरणाचे काम अंतिम टप्यात असताना १०० टक्के अचूकता साध्य करण्यासाठी सातबारा उतारा वाचन करण्याचे काम सुरू आहे. उतारे वाचताना काही त्रुटी आढळून येत आहेत. आतापर्यंत वाचलेल्या उताऱ्यांमध्ये सात हजार उताऱ्यांमध्ये त्रुटी आहेत. तसेच https://bhulkeh.mahabhumi.gov.in या वेबसाइटला भेट देऊन खातेदाराला स्वत:चा सातबारा अचूक आहे का, हेही तपासता येणार आहे.

----------

सातबारा उताऱ्यांमध्ये चूक दुरुस्तीचे अर्ज सर्व तहसील कार्यालयात स्वीकारण्यात येत आहेत. संकेतस्थळावरही ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, प्रत्येक महसुली गावांमध्ये खास सातबारा दुरुस्तीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. नागरिकांनी संबंधित तलाठी, मंडळअधिकारी, तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमधील त्रुटी दूर होतील.

-उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल)

---------------

तालुकानिहाय सातबारा तपशील

तालुका एकूण गावे सातबारा संख्या वाचन झालेले उतारे त्रुटी असलेले उतारे

अहमदनगर ११९ १६४७४३ १०४३०० ११९४

अकोले १९१ १३३३३६ ९४६०० ५७०

राहुरी ९६ ८६९८७ ३४६९६ ३८७

पारनेर १३१ ११४४३१ ११४४३१ १०००

श्रीगोंदा ११५ ६३३०४ ६३३०४ ६०९

कर्जत ११८ ९४७७४ ६४०६५ २९८

जामखेड ८७ ४९८४८ ४१५४४ २९५

संगमनेर १७४ १७३३१२ ८६४२० १४४

कोपरगाव ७९ ६४५८२ ३९०७० ३४२

राहाता ६१ ५२५५९ ५२५५९ ५५२

श्रीरामपूर ५६ ४२८१२ ३९१९६ २८१

नेवासा १२७ ७८१५४ ७८१५४ ४१०

पाथर्डी १३७ ९३३६९ ७८४२० ३३७

एकूण १६०४ १२,८२,५८२ ९,५९,६४० ७९११

Web Title: Twelve million seventeen excerpts now online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.