केलवड गावात एकाच घरात दोनदा घरफोडी
By Admin | Updated: May 23, 2017 14:50 IST2017-05-23T14:50:08+5:302017-05-23T14:50:08+5:30
राहाता तालुक्यातील केलवड गावात पोपट शंकर गोडगे यांच्या राहत्या घरी एकाच महिन्यात दोनदा घरफोडी झाली़

केलवड गावात एकाच घरात दोनदा घरफोडी
आॅनलाईन लोकमत
अस्तगाव, दि़ २३ - राहाता तालुक्यातील केलवड गावात पोपट शंकर गोडगे यांच्या राहत्या घरी एकाच महिन्यात दोनदा घरफोडी झाली़ त्यामुळे गोडगे कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी गोडगे परिवार मुंबईला गेला असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ३ तोळे सोने, दागीने, टी़व्ही़ तांबे व पितळाचे भांडे, कपडे चोरुन नेले होते़ गोडगे यांनी पोलिसांत तक्रार केली होती़ त्यानंतर या घटनेचा पंचनामा करण्यात आला़ त्यानंतर सोमवारी (दि़२२) रात्री पुन्हा त्याच घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आले़ परंतु, चोरट्यांचा डाव फसला. प्रत्येक वेळी एकाच घरात चोरटे पाळत ठेऊन असल्याने गोडगे कुटुंबात घबराट निर्माण झाली आहे. चोरटे गावातीलच असल्याचा अंदाज पिडीत कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पिडीत कुटुंबीयांनी केली आहे.