शेळके वस्ती शाळेला माजी विद्यार्थी महेश कोते यांच्याकडून टीव्ही भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:47+5:302021-06-29T04:15:47+5:30
शेळके वस्ती शाळा विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा क्षीरसागर यांनी कोरोना आपत्तीतही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत ...

शेळके वस्ती शाळेला माजी विद्यार्थी महेश कोते यांच्याकडून टीव्ही भेट
शेळके वस्ती शाळा विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा क्षीरसागर यांनी कोरोना आपत्तीतही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीत कमतरता भासू नये यासाठी अध्यापनाचे सुयोग्य नियोजन केले आहे. गटपद्धती, ऑनलाइन व ऑफलाइन अध्यापन व गृहभेटी देऊन सहशिक्षिका स्वाती पटारे यांच्यासह शाळेच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षकांची शाळेविषयी असलेली धडपड पाहून शाळेचे माजी विद्यार्थी महेश दत्तात्रय कोते यांनी स्मार्ट टीव्ही शाळेला भेट दिला आहे. कोते हे सध्या अमेरिकेत (शिकागो) येथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात कार्यरत आहेत. यावेळी महेश कोते यांचे वडील दत्तात्रय कोते व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. वाकडीचे लोकनियुक्त सरपंच डॉ. संपतराव शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण नानासाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा शेळके, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जालिंदर रक्टे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेला मिळालेल्या या स्मार्ट टीव्हीमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका क्षीरसागर यांनी कोते यांच्या देणगीबद्दल आभार मानले.
------------
फोटो - २७टीव्ही भेट
राहाता तालुक्यातील वाकडी केंद्रातील शेळके वस्ती शाळेचे माजी विद्यार्थी महेश कोते यांनी शाळेला स्मार्ट टीव्ही भेट दिला.