कामरगावच्या सरपंचपदी तुकाराम कातोरे, उपसरपंचपदी पूजा लष्करे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST2021-02-11T04:22:12+5:302021-02-11T04:22:12+5:30

निंबळक : कामरगाव (ता. नगर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दगडू कातोरे यांची व उपसरपंचपदी पूजा संदीप लष्करे ...

Tukaram Katore as Sarpanch of Kamargaon, Pooja Lashkare as Deputy Sarpanch | कामरगावच्या सरपंचपदी तुकाराम कातोरे, उपसरपंचपदी पूजा लष्करे

कामरगावच्या सरपंचपदी तुकाराम कातोरे, उपसरपंचपदी पूजा लष्करे

निंबळक : कामरगाव (ता. नगर) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दगडू कातोरे यांची व उपसरपंचपदी पूजा संदीप लष्करे यांची बहुमताने निवड झाली.

कामरगाव येथे गेल्या २५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या गटाला मतदारांनी यावेळी बाजूला ठेवले. माजी सरपंच वसंतराव ठोकळ, अशोकराव ठोकळ, ज्येष्ठ नेते श्यामराव आंधळे, युवा नेते राजेंद्र आंधळे यांनी पाठिंबा दिलेल्या ‘जय जवान जय किसान’ गटाला सात जागा मिळाल्या. सरपंच निवडीमध्ये तुकाराम कातोरे व पूजा लष्करे यांची बहुमताने निवड झाली. त्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोष केला. गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या विजयी सभेत माजी सरपंच वसंत ठोकळ, पक्ष प्रमुख प्रकाश ठोकळ, पोपट ठोकळ, अनिल आंधळे, राम नानेकर, सिद्धांत आंधळे, संतोष आंधळे यांची भाषणे झाली. ग्रामपंचायत सदस्य संदीप ढवळे यांनी आभार मानले.

Web Title: Tukaram Katore as Sarpanch of Kamargaon, Pooja Lashkare as Deputy Sarpanch