पांगरमल येथे पतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:39 IST2018-05-28T14:37:32+5:302018-05-28T14:39:36+5:30
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांगरमल येथे पतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी गर्जे यांची पत्नी लिलाबाई या पांगरमल (ता. नगर) येथे माहेरी आल्या होत्या. घरगुती वादातून त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. गर्जे हे लिलाबाई यांना पांगरमल येथे घेण्यासाठी आले असता मेव्हुणा चंद्रहास व पत्नी लिलाबाई यांनी गर्जे यांना खाली पाडून त्यांच्या तोंडात रोगर या विषारी द्रव्याची बाटली ओतली. त्यानंतर गर्जे यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे पोलिसांनी गर्जे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर गर्जे यांच्या फिर्यादीवरुन रविवारी (दि. २७) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. सासरे हरिभाऊ बाबुराव आव्हाड, सासू सुमनबाई हरिभाऊ आव्हाड, मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड व पत्नी लिलाबाई शिवाजी गर्जे (सर्व रा. पांगरमल, ता. नगर) अशा चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.