भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:45+5:302021-06-09T04:26:45+5:30
ही घटना रविवारी ( दि. ६) संध्याकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात ...

भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
ही घटना रविवारी ( दि. ६) संध्याकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेश माधव मुळे (वय ३२, धंदा. ड्रायवर, रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर) असे या घटनेतील जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ अमेय माधव मुळे (रा. धांदरफळ बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेली व्यक्ती टू प्लस यादीतील आहे, असे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परेश मुळे यांचे मित्र भाऊसाहेब संपत कानवडे (रा. निमगाव पागा ता. संगमनेर) यांनी रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. अमेय मुळे हा या दुचाकीचे नुकसान करत होता. त्यावेळी परेश मुळे यांनी अमेय मुळे याला 'तू माझ्या मित्राची गाडी का फोडतो ', असे विचारले असता त्याने 'तू मध्ये का आलास, तू माझ्या दारू व्यवसायाची माहिती पोलिसांना का देतो? आता तुझा काटा काढतो,' असे म्हणत त्याने परेश मुळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.