शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना घरे देण्यासाठी प्रयत्न करणार : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 11:44 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून प्रत्येकांसाठी घरकूल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे़

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून प्रत्येकांसाठी घरकूल योजना राबविण्याचा संकल्प केला आहे़ नगर शहर व जिल्ह्यातही गरिबांना घरे मिळण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिले़महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत राबविण्यात येत असलेल्या घरकूल योजनेची शनिवारी येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विखे यांच्याहस्ते लकी ड्रॉ द्वारे सोडत झाली़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, महापालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख, सभापती लता शेळके आदी उपस्थित होते़विखे म्हणाले अहमदनगर महानगरपालिकेने ज्या ठिकाणी जागा असतील तेथील घरकूल योजनेचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावेत़ या मंजुरीसाठी पाठपुरावा करू़ राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असल्याने या कामांना तत्काळ मंजुरी मिळेल़ असे ते म्हणाले़ जगताप म्हणाले ज्यांना घरे नाहीत अशा सर्वांना आता घरे उपलब्ध होणार आहेत. झोपडपट्टी भागातील नागरिकांना वारूळाचा मारूती, काटवन खंडोबा येथे घरे मिळालेली आहेत. रामवाडी झोपडपट्टी हा भाग कॅन्टोन्मेंट परिसरात असल्यामुळे त्यांना मध्यंतरी अडचणी आल्या होत्या त्या सोडविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले़वाकळे म्हणाले केडगाव, वारूळाचा मारूती रोड या भागामध्ये ८४० घरे बांधण्यात येणार आहे. सावेडी ,केडगाव अशा भागामध्ये जागा पाहून त्या ठिकाणीही घरकूल योजना राबविण्यात येणार आहे. आणखी ५५० घरांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहे. घरकुलांसाठी अर्जाची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार महापालिकेकडे ११ हजार ५२४ अर्ज प्राप्त झाले आहेत़ ज्यांनी अर्ज केला आहे़ अशा प्रत्येकाला घर मिळणार असल्याचे वाकळे म्हणाले़जगताप-विखे यांच्यात गुफ्तगूलोकसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढविणारे संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे शनिवारी एकाच व्यासपीठावर होते. घरकुल योजनेच्या सोडतप्रसंगी खासदार विखे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार जगताप यांचे आगमन झाले. यावेळी आमदार जगताप यांचे स्वागत आहे, असे विखे म्हणाले. त्यानंतर विखे-जगताप एकमेकांच्या शेजारीच बसले.८४० लाभार्थ्यांची सोडतआजच्या लकी ड्रॉ मध्ये ८४० चिठ्ठ्या काढण्यात येतील त्यांना घर उपलब्ध होणार आहेत. ज्यांची नावे या लकी ड्रॉ मध्ये येतील त्यांनी महापालिकेत येऊन संबंधित अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी़ असे ते म्हणाले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका