दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न : तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 15:56 IST2018-09-11T15:56:54+5:302018-09-11T15:56:57+5:30
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील तलाठी कवेश्वर बाबुराव भडकवाल यास सात-बारावरील कर्जाचा बोजा उता-यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न : तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील तलाठी कवेश्वर बाबुराव भडकवाल यास सात-बारावरील कर्जाचा बोजा उता-यावर घेण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन गहाण ठेऊन घेतलेल्या कर्जाचा बोजा सात ब ारा उता-यावर घेण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच भडकवाल याने मागितली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार पंच साक्षीदारांसह तलाठ्याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरीस पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी ही कारवाई केली.