तृप्ती देसाई यांना शिर्डीला जाण्याआधीच सुपा येथे अडवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:06 IST2020-12-10T13:05:25+5:302020-12-10T13:06:13+5:30
अहमदनगर: भूमाता ब्रिगैडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना नगर पोलिसांनी सुपा येथेच अडवले. देसाई यांनी मात्र शिर्डीला जाणारच असा निर्धार केला आहे.

तृप्ती देसाई यांना शिर्डीला जाण्याआधीच सुपा येथे अडवले
अहमदनगर: भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना अहमदनगर पोलिसांनी सुपारी टोल नाक्या जवळच अडवले आहे. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत मी शिर्डीला जाणारच असा ठाम निर्धार देसाई यांनी केलेला आहे. दरम्यान सुपा टोल नाक्यावर व अहमदनगर ते शिर्डी मार्गावर ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिर्डी येथील साई संस्थांनने भारतीय पेहरावात दर्शन घेण्याचा फलक लावलेला आहे. हा फलक हटवण्यासाठी तृप्ती देसाई आज शिर्डीत येत आहेत. त्यामुळे शिर्डीमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता म्हणून पोलिसांनी देसाई यांना शिर्डीत येऊ न देता त्यांना नगर हद्दीवर अडविण्याचे नियोजन सकाळपासूनच केले होते. दरम्यान एका वाहनातून देसाई या पुणे येथून नगर मार्गे शिर्डीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना पारनेर जवळील सुपा टोल नाका जवळच अडवले. त्यामुळे देसाई या संतप्त झाल्या असून कोणत्याही परिस्थितीत मी शिर्डीला जाणारच असे त्यांनी माध्यमांना सांगितले.