पोलीस असल्याची बतावणी करुन ट्रक चालकास लुटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST2021-02-17T04:26:57+5:302021-02-17T04:26:57+5:30

काष्टी : आम्ही पोलीस आहोत. गाडीत काय माल भरला आहे, अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेम्पोमधील क्लीनर ...

The truck driver was robbed by police | पोलीस असल्याची बतावणी करुन ट्रक चालकास लुटल

पोलीस असल्याची बतावणी करुन ट्रक चालकास लुटल

काष्टी : आम्ही पोलीस आहोत. गाडीत काय माल भरला आहे, अशी चौकशी करत रजिस्टरवर सही करण्याच्या बहाण्याने टेम्पोमधील क्लीनर साईटच्या सीट खाली ठेवलेले २७ हजार १०० रुपये काढून घेत ट्रक चालकाला लुटल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर निमगाव खलू शिवार घडली.

याबाबत ट्रकचालक लखन नायक (रा. बगवा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) यांनी दिलेल्या माहितीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टेम्पो हा नगर-दौंड रस्त्याने जात असताना बिगर क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमानी निमगाव खलू शिवारात टेम्पो चालकाला दुचाकी आडवी लावत टेम्पो थांबवण्यास सांगितला. आम्ही पोलीस असल्याचे सांगत चालक व क्लीनरला खाली उतरवले. त्यांच्याकडे चौकशी करत त्यांना एका रजिस्टरवर सही करण्यास सांगितले. चालक व क्लीनरला बोलण्यात गुंतवून त्यातील एका इसमाने टेम्पोमधील सीट खाली ठेवलेली २७ हजार १०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत

Web Title: The truck driver was robbed by police