जेऊरमध्ये ट्रकचालकास लुटले

By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:19+5:302020-12-05T04:34:19+5:30

केडगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात बुधवारी (दि.२) पहाटे चारच्या सुमारास ट्रकचालकास लुटल्याची घटना भारत ...

The truck driver was robbed in Jeur | जेऊरमध्ये ट्रकचालकास लुटले

जेऊरमध्ये ट्रकचालकास लुटले

केडगाव : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात बुधवारी (दि.२) पहाटे चारच्या सुमारास ट्रकचालकास लुटल्याची घटना भारत पेट्रोलपंपासमोर घडली.

औरंगाबादहून मुंबई येथे जाणाऱ्या कंटेनरचा (एम. एच. ४६ बी. ई. ६३५४) बिघाड झाल्याने चालक अमिरऊल विश्वास (रा. कोलकाता) हा पेट्रोलपंपासमोर कंटेनर उभा करून केबिनमध्ये झोपला होता. पहाटे चारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन जणांनी कंटेनरमधील डिझेल चोरले. यावेळी चालकास जाग आल्याने त्याने आरडाओरड केला असता चोरांनी डिझेल घेऊन तिथून पोबारा केला. त्यानंतर मोटारसायकलवर तिघेजण कंटेनरचालकाजवळ आले. कंटेनरची काच फोडून केबिनमध्ये प्रवेश करून चालकास मारहाण करत त्याच्याकडील आठ हजार रुपये चोरून नेले. यावेळी पंपावरील कर्मचारी गणपत आव्हाड याला दमबाजी करत चोरांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. परंतु, आव्हाड याने दरवाजा उघडण्यास नकार देऊन मॅनेजरला फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पलायन केले.

Web Title: The truck driver was robbed in Jeur