३१ लाखांच्या खाद्यतेलासह ट्रक पळवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST2021-06-06T04:16:24+5:302021-06-06T04:16:24+5:30
गुजरात (सुरत) येथे राहणाऱ्या अशोककुमार रामनिवास चौधरी या तेलाच्या व्यापाऱ्याला खाद्यतेलाचा माल पुणे येथील बसंत ट्रेडिंग कंपनीला पोहोच करायचा ...

३१ लाखांच्या खाद्यतेलासह ट्रक पळवला
गुजरात (सुरत) येथे राहणाऱ्या अशोककुमार रामनिवास चौधरी या तेलाच्या व्यापाऱ्याला खाद्यतेलाचा माल पुणे येथील बसंत ट्रेडिंग कंपनीला पोहोच करायचा होता. त्यासाठी त्यांनी संगमनेरातील (एमएच १७, एजी ७७८९) या क्रमांकाच्या मालट्रकमधून दोघांवर जबाबदारी सोपविली होती. हा माल पुणे येथे ३० मे दुपारी अडीच वाजल्यापासून ते २ जूनपर्यंत पोहचलाच नसल्याचे चौकशीअंती समोर आले. संगमनेरातील संशयितांनी त्याचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. या मालवाहू ट्रकमध्ये सोया तेलाचे २७ लाख ५३ हजार ९३९ रुपये किमतीचे प्रत्येकी १५ लिटरचे १ हजार ९० डबे, २ लाख ५२ हजार ६३२ रुपये किमतीचे एक लिटर सोया तेलाचे १० पाऊच असलेले २०० डबे असा सुमारे ३० लाख ६ हजार ५७१ रुपये किमतीचा माल होता.
हा माल निर्धारित ठिकाणी पोहचला नसल्याने व्यापारी अशोककुमार चौधरी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, मालट्रकसह दोघेही फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी करत आहेत.