वडगाव पान टोलनाक्यावर पुन्हा ट्रक धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 18:38 IST2018-06-20T18:37:37+5:302018-06-20T18:38:08+5:30
कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकेदायक टोल नाक्याला मंगळवारी रात्री पुन्हा टि.एन. ५२, सी.-५५८५ हि संगमनेर मार्गे येणारी मालवाहू ट्रक धडकली.

वडगाव पान टोलनाक्यावर पुन्हा ट्रक धडकला
वडगावपान : कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकेदायक टोल नाक्याला मंगळवारी रात्री पुन्हा टि.एन. ५२, सी.-५५८५ हि संगमनेर मार्गे येणारी मालवाहू ट्रक धडकली. या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही. परंतु मालट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
यापूर्वी एका मालवाहू ट्रकने धडक दिल्याने कोसळला होता. नंतर धोकेदायक झालेला टोलनाका पाडण्यात आला परंतु; दुभाजकावरील काही अवशेष काढावयाचे राहिले होते. वाहन चालकांना रात्री या ठिकाणी अंदाज येत नसल्याचे लोक सरळ येऊन दुभाजकावर येवून आदळतात. तरी सदर जागेत दिशादर्शक फलक व सूचना फलक लावण्याची मागणी ग्रामस्थ होत आहे.