तनपुरे कारखाना सभेत गोंधळ
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:22:17+5:302014-09-28T23:27:36+5:30
राहुरी : ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या थकीत पगारावर तनपुरे कारखान्याची सभा चांगलीच गाजली.

तनपुरे कारखाना सभेत गोंधळ
राहुरी : ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या थकीत पगारावर तनपुरे कारखान्याची सभा चांगलीच गाजली. सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांचे भाषण बंद पाडले़ घोषणाबाजी करीत संचालक मंडळाच्या दिशेने अहवाल भिरकावण्यात आले. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.
कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी होती. कामगारांचे पगार थकल्याने सभा गोंधळात होणार, अशी शक्यता होतीच. सभेत विरोधी संचालक शिवाजीराव गाडे यांनी तीन गळीत हंगामात ७५ कोटी रूपयांचा तोटा झाला़ ऊस उत्पादकांचे १८ कोटी, तर कामगारांचे ७० कोटी रूपये कधी देणार, अशी विचारणा केली़ त्यावर तनपुरे यांनी अहवालावर बोला असे सुनावले़ त्यानंतर माजी अध्यक्ष रामदास धुमाळ बोलण्यास उठले. जिल्हा बँकेने सहकार्य केल्याचे सांगताच तुम्ही अध्यक्षांशी चर्चा करून पेमेंट द्यावे, अशी मागणी सभासदांनी केली़
शेतकरी संघटनेचे कारभारी कापसे यांनी कारखाना चालविण्यास द्यावा, असे सुचविले़ बाळासाहेब जठार, बाळासाहेब चव्हाण यांनी कारखाना व्यवस्थापनावर टीका केली. घोषणाबाजीला सुरूवात झाल्याने वीस मिनिटे सभा बंद ठेवावी लागली़ नंतर घाईघाईत वंदे मातरमने समारोप करण्यात आला.
चर्चेत शेतकरी संघटनेचे दिलीप इंगळे, कांता कदम, बाबासाहेब म्हसे, साहेबराव म्हसे, रावसाहेब मुसमाडे, सुखदेव कुसमुडे यांनी भाग घेतला़ सभेस दतात्रय अडसुरे, सभापती अरूण तनपुरे, सुनील अडसुरे, दत्ता कवाणे, सुरेश निमसे आदी उपस्थित होते़