त्रिभुवनवाडीत ५५० कोंबड्या, ८ शेळ्या पुरात वाहून गेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:08+5:302021-09-02T04:46:08+5:30

करंजी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्रिभुवनवाडी येथील गोरक्ष रामभाऊ पालवे यांच्या घरात पाणी घुसून संपूर्ण संसार वाहून ...

In Tribhuvanwadi, 550 chickens and 8 goats were washed away | त्रिभुवनवाडीत ५५० कोंबड्या, ८ शेळ्या पुरात वाहून गेल्या

त्रिभुवनवाडीत ५५० कोंबड्या, ८ शेळ्या पुरात वाहून गेल्या

करंजी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्रिभुवनवाडी येथील गोरक्ष रामभाऊ पालवे यांच्या घरात पाणी घुसून संपूर्ण संसार वाहून गेला. या पुरामुळे ५५० कोंबड्या व ८ शेळ्या वाहून गेल्या. देवराई येथील राहुल कारखेले यांच्या विहिरीचे बांधकाम कोसळून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले.

सोमवारी रात्री ७ वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल १२ तास चालू होता. रात्रभर चालू असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील तलाव व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. करंजीसह, दगडवाडी, वैजूबाभुळगाव, भोसे, खांडगाव, जोहारवाडी, कौडगाव, त्रिभुवनवाडी, घाटसिरस, देवराईसह अनेक गावांत मोठ्या प्रमाणात पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी नदीकाठी राहत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. त्रिभुवनवाडी येथील गोरक्ष रामभाऊ पालवे यांच्या घरात पाणी घुसून संसारोपयोगी वस्तू, ५५० कोंबड्या व ८ शेळ्या वाहून गेल्याची घटना घडली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने या भागातील पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: In Tribhuvanwadi, 550 chickens and 8 goats were washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.