कोल्हूबाई गडावरील झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:21 IST2021-04-04T04:21:52+5:302021-04-04T04:21:52+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील कोल्हूबाई गडावर कोल्हूबाई विकास मंडळासह ग्रामस्थांच्या माध्यमातून लावण्यात आलेली ...

कोल्हूबाई गडावरील झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील कोल्हूबाई गडावर कोल्हूबाई विकास मंडळासह ग्रामस्थांच्या माध्यमातून लावण्यात आलेली जांभूळ, पिंपळ, सिल्व्हर ओक, पारिजात अशी साधारण दोनशेहून अधिक झाडे व त्या झाडांसाठी करण्यात आलेले ठिंबक सिंचनचे पाईप वीज रोहित्रामध्ये बिघाड होऊन लागलेल्या आगीत खाक झाली. या आगीमुळे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज माजी सैनिक व कोल्हूबाई विकास मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ पालवे यांनी व्यक्त केला.
महावितरणच्या गलथानपणामुळे ही हानी झाली. याच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गावातील सचिन पालवे मेजर, कृष्णा नेटके, अभी पालवे, रवी पालवे, प्रशांत पालवे, अजय पालवे, निलेश पालवे, राहुल गर्जे, नयन पालवे, संतोष नेटके, संभाजी पालवे, अक्षय पालवे, रुद्रा पालवे, सचिन पालवे, टिलू पालवे, अक्षय पालवे, कैलास पालवे, रवींद्र पालवे, अनिकेत घुले, सनी नेटके, सचिन पालवे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.