वाकडी येथे प्रहारकडून वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST2021-07-14T04:25:03+5:302021-07-14T04:25:03+5:30
अनावश्यक खर्चाला फाटा देऊन निर्सगाच्या संगोपन व संवर्धनाचा विडा उचलत येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगळावेगळा उपक्रम राबवत एक ...

वाकडी येथे प्रहारकडून वृक्षलागवड
अनावश्यक खर्चाला फाटा देऊन निर्सगाच्या संगोपन व संवर्धनाचा विडा उचलत येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आगळावेगळा उपक्रम राबवत एक आदर्श घडवला आहे. यामध्ये वाकडी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व वाकडी आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी राहाता जनसंपर्क प्रमुख जालिंदर लांडे, वाकडी गावचे सरपंच संपतराव शेळके, लक्ष्मणराव कोते, सोसायटी चेअरमन कल्याणराव सदाफळ, भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र लहारे, रूपेंद्र काले, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव शेळके, शिवसेनेचे महेश जाधव, संदीपानंद लहारे, तलाठी भाऊसाहेब बोद्धमवार, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरडे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर कोते, सुनील कुरकुटे, बाबासाहेब शेळके, दत्तात्रय कोते, पोलीस पाटील मच्छिंद्र अभंग, हरिभाऊ गोरे, अशोकराव कोते, संजय एलम, संजय पावसे, विजय गोरे, गोटीराम गोरे, संतोष बोऱ्हाडे, सोमनाथ शेळके, लक्ष्मण सदाफळ, रवी कापसे, तात्यासाहेब रसाळ उपस्थित होते.