बाळासाहेब विखे पाटलांच्या स्मृतीदिनी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST2021-01-01T04:15:00+5:302021-01-01T04:15:00+5:30

आश्वी खुर्द येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब भोसले, विखे पाटील कारखान्याचे संचालक डाॅ. दिनकर गायकवाड, रामभाऊ भुसाळ, ...

Tree planting in memory of Balasaheb Vikhe Patil | बाळासाहेब विखे पाटलांच्या स्मृतीदिनी वृक्षारोपण

बाळासाहेब विखे पाटलांच्या स्मृतीदिनी वृक्षारोपण

आश्वी खुर्द येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब भोसले, विखे पाटील कारखान्याचे संचालक डाॅ. दिनकर गायकवाड, रामभाऊ भुसाळ, विनायक बालोटे, बाळासाहेब मांढरे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी निघुते, विजय शेळके, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, प्रशांत कोडोलिकर, प्राचार्य राम पवार, प्राचार्य सयाराम शेळके, रवी गायकवाड यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वतीने आश्वी महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ५० दात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक प्राचार्य पवार यानी केली. सुत्रसंचालन प्रा. सुनंदा पाचौरे, डी. डी. तांबे यांनी केले. उपप्राचार्य देविदास दाभाडे यांनी आभार मानले.

Web Title: Tree planting in memory of Balasaheb Vikhe Patil