भाजपच्या वतीने शहरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:26+5:302021-06-09T04:26:26+5:30

बेलापूर व भेर्डापूर येथील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी बेलापूर येथे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक ...

Tree planting in the city on behalf of BJP | भाजपच्या वतीने शहरात वृक्षारोपण

भाजपच्या वतीने शहरात वृक्षारोपण

बेलापूर व भेर्डापूर येथील कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी बेलापूर येथे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुनील मुथा, पुरूषोत्तम भराटे, प्रफुल्ल डावरे, रंजीत श्रीगोड, बाळासाहेब धनवटे, डॉ. संदीप कवडे, डॉ. प्रमोद कवडे, भाऊसाहेब बडाख उपस्थित होते.

पढेगाव व कारेगाव याठिकाणी ग्रामपंचायतला भेट देऊन कोरोना योद्धा व सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी सरपंच सदा लिप्टे, उपसरपंच उमाकांत कांदळकर, प्रवीण लिपटे, मुकुंद लबडे, महेश खरात सरपंच आनंद वाघ, प्रणव भारत उपस्थित होते.

टाकळीभान येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने गेल्या ४५ दिवसांपासून चालविण्यात येणाऱ्या गरीब थाळी केंद्राला गोंदकर यांनी भेट दिली. या गरीब थाळीचा दोन हजारांहून अधिक नागरिक दररोज लाभ घेत आहेत. या कामास विदेशातून देणगी मिळालेली आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतीश सौदागर, रामभाऊ तरस, बंडूकुमार शिंदे, विठ्ठल राऊत, श्रीराज डेरे, अनिल भानगडे, तालुकाध्यक्ष बबन मुठे आदी उपस्थित होते.

------

फोटो ओळी : ०७०६ २०२१ भाजप

भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त श्रीरामपुरात वृक्षारोपण करण्यात आले.

------

Web Title: Tree planting in the city on behalf of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.